डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बारीकराव मडावी यांच्या प्रचारास सुरुवात

233

-गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून बीआरएसपीचे अधिकृत उमेदवार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : लोकसभा निवडणूक २०२४ चा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. याकरिता उमेदवार आपला प्रचार जोमात करतांना दिसत आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून बीआरएसपी चे उमेदवार बारीकराव मडावी यांनी ब्रम्हपुरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचारास सुरुवात केली.बारीकराव मडावी यांचा निवडणुकीतील बोधचिन्ह सिटी आहे. लोकसभा क्षेत्रातील गावात भेटी देऊन जोमात प्रचार सुरू असून क्षेत्रातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत समस्या जाणून घेत आहे.
यावेळी ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष मेंढे, तालुका प्रमुख बावणे, चिमूर विधानसभा अध्यक्ष निकेश रामटेके, रोशन मेंढे, राजू मडावी, योगेश मडावी, प्रफुल ठेंगणे, मोरेश्वर उईके, मनीष शेंडे चिमूर तालुका महासचिव प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here