कुरखेडा : नेतेंच्या प्रचाराचे बॅनर लावू देण्यास नागरिकांचा तिव्र विरोध

3934

-लोडशेडींगने नागरिक त्रस्त
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १० : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. अशातच उमेदवारांकडून मोठ्या जोमात प्रचारास सुरूवात करण्यात आली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रामधून दोनदा खासदार म्हणून राहिलेले अशोक नेते यांच्यावर जिल्हयातील नागरिक नाराज असतांना दिसत असुन जिल्हयातील कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथील नागरिकांनी या निवणुकीतील त्याच्या प्रचाराचे बॅनर लावू देण्यास तिव्र विरोध दर्शविला. याबाबतचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर वायरलही झाले आहे.

 

कुरखेडा तालुक्यात लोडशेडिंगमुळे शेतपिकांना पाणी देणे अडचणीचे जात आहे. यामुळे हातामध्ये आलेले पिक करपण्याच्या मार्गावर आहे. अनेकदा लोडशेडिंगची समस्या सोडविण्यासाठी मागणी करूनही लोडशेडिंग सुरूच आहे. दोनदा या क्षेत्राचे खासदार म्हणून राहिलेले अशोक नेते हे या समस्या मार्गी लावू न शकल्याने नागरिक नाराज झाले आहेत. अशोक नेते यांच्या प्रचाराचे बॅनर कुरखेडा तालुक्यातील पुराडा येेथे लावण्यात येत असतांना काही नागरिकांनी बॅनर गावात लावण्यास तिव्र विरोध दर्शविला व बॅनर परतवुन लावले. याबाबतचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठया प्रमाणात व्हायरलही झाले आहे. गावामध्ये प्रचार बॅनर लावू देणार नाही आणि प्रचार वाहनही येवू देणार नाही असा पवित्रास येथील काही नागरिकांनी घेतल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे. त्यामुळे भाजपच्या अशोक नेते यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora #loksabhaelection2024 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here