सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ डॉ. धृव बत्रा ११ एप्रिलला सर्च रुग्णालयात करणार मेंदूविकार तपासणी

205

The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : समाजामध्ये असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढत आहे. स्ट्रोक (अर्धांगवायू, पॅरालिसिस) यासारखे मेंदूविकार अकस्मात होणार्‍या मृत्यूसाठी करणीभूत ठरत आहेत. आता सर्च रुग्णालयात नागपुर येथील मेंदूविकार तज्ञांद्वारे तपासणी सुविधा उपलब्ध झालेली आहे. मेंदूविकार ओपीडी प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या गुरुवारला निजोजित असून, गुरुवार ११ एप्रिल २०२४ ला मेंदूविकारतज्ञ डॉ. धृव बत्रा यांच्या कडून या ओपीडीमध्ये तपासणी करण्यात येणार आहे.
मेंदूविकार ओपीडी मध्ये स्ट्रोक (अर्धांगवायू, पॅरालिसिस) बरोबरच झटक्यांचा (मिरगी) आजार, विविध मज्जातंतूचे आजार, पार्किंन्सन आजार, अल्जायमर आजार, जुनाट डोकेदुखी, लहान मुलांचे मेंदूचे आजार, एपिलेप्सी, चक्कर येण्याचे अनेक आजार, मद्यपानामुळे होणारे मेंदूविकार अशा अनेक आजारांवर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व उपचार मिळणार आहे.
मेंदुविकार ओपीडी दर महिन्याच्या चौथ्या शनिवारला नियोजित होती. पण या मध्ये बदल करण्यात आलेला आहे. ही ओपीडी आता दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारला नियोजित करण्यात येत आहे. या महिन्याची मासिक ओपीडी गुरुवार ११ एप्रिल २०२४ रोजी असून मेंदुविकार तज्ञ डॉ. धृव बत्रा नागपूर, सर्च रुग्णालयात तपासणी करिता येणार आहेत. तरी मेंदूविकार विशेषज्ञ ओपीडी सुविधेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावा, असे आवाहन सर्च रुग्णालयातर्फे करण्यात येत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #serchhospitalchtgo)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here