कुरखेडा शहरात इष्टदेव झूलेलाल महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा

147

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ११ : पूज्य सिंधी पंचायत कुरखेडाच्या वतीने येथील फव्वारा चौकात इष्टदेव झूलेलाल महाराज यांचा प्रकट दिन बुधवार १० एप्रील रोजी विविध कार्यक्रमांनी उत्सवात साजरा करण्यात आला.
यावेळी इष्टदेव झूलेलाल महाराज यांचा प्रतिमेची विधीवत पूजा व आरती करण्यात आली तसेच महाप्रसादाचे वितरण बाजारपेठेत करण्यात आले. तसेच सांयकाळी पूज्य सिंधी पंचायत यांचा वतीने गांधी चौक कुरखेडा येथून झूलेलाल महाराज यांचा प्रतिमेची शहरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी पूज्य सिंधी पंचायत चे मूखीया माधवदास निरंकारी, राजकूमार जिवाणी, राजकूमार रामचंदानी,भागचंद, टहलानी,जोतूमल माखीजा, विष्णू तख्तानी, नानक कुकरेजा, गोपाल वरलानी, छमनदास माखीजा, धरमदास रामचंदानी, राजेश जेठानी, अशोक माखीजा, विवेक निरंकारी, विक्की जिवाणी, रोहित मनूजा, सागर निरंकारी, अनिल सचदेव, लखन रामचंदानी, संकेत मनूजा, आशू रामचंदानी, साहील वरलानी, नितेश निरंकारी, दिनेश रामचंदानी, तूषार टहलानी, दूर्गेश रामचंदानी, रितेश मनूजा आकाश वरलानी, शूभनीत निरंकारी, देव केशवानी, सूजल वरलानी, अंश रामचंदानी, जयंत मनूजा, क्रीश जेठानी, रोशन छाबरा विनू तक्तानी, दिपेश तक्तानी तसेच सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थीत होते. यावेळी सिंधी पंचायतच्या वतीने येथील सामाजिक कार्यकर्ते रविन्द्र गोटेफोडे, पत्रकार सिराज पठान व राकेश चव्हाण यांचा टावेल परिधान करीत सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here