अबॅकस म्हणजे गणित नव्हे ही तर जादू : उदयकुमार शिंदे

235

The गडविश्व
करमाळा :जिनियस प्रोअँक्टिव.अबँकस सेंटर जेऊर येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता मिळवलेल्या 12 विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा करमाळा येथील यशकल्यानी सेवाभवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी श्री करिअर अकॅडमी बार्शी चे संस्थापक उदयकुमार शिंदे यावेळी बोलत होते ते म्हणाले की गणितीय पद्धतीची इतकी साधी सुलभ प्रक्रिया ही जादूपेक्षा कमी नसल्याचे नमूद केले.यावेळी मुलांनी सादर केलेले डेमो उपस्थितांना अवाक करणारे ठरले. क्षणाचाही विलंब न लावता गणिताची उत्तरे फक्त बोटांच्या हालचालीवर सांगणे म्हणजे अबकस नावाची जादू मुलांनी अंगिकारल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान यशकल्यानी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश करे- पाटील हे होते.
यावेळी पलक बलदोटा, स्वरा निर्मळ,अनुष्का जाधव व आयुष जाधव या विद्यार्थ्यांनी डेमो सादर केले तर सई नलवडे,पलक बलदोटा ,स्वरा निर्मळ, प्रांजल दराडे, दक्ष राज कोंडे – देशमुख या छोट्याशा मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पालकांमधून सौ.क्षितिजा कोंडे – देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर आदर्श शिक्षिका साधनाताई कोंडे – देशमुख व सुरताल संगीत विद्यालय करमाळ्याचे संस्थापक नरारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी सन्मानपत्र त्याचप्रमाणे यशकल्यानी संस्थेकडून सन्मानपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात प्रा.करे यांनी अबॅकससाठी लागणारी सर्वतोपरी मदत यशकल्यानी संस्था देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. जिनिअस प्रोअँक्टिव अबॅकस सेंटरच्या संचालिका कु.अंकिता वेदपाठक यांच्या कार्याबद्दल विशेष आभार मानत सन्मान केला.
यावेळी कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अंकिता वेदपाठक यांनी केले तर आभारविष्णू वेदपाठक यांनी मानले. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी यशकल्यानी संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here