The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : जिल्ह्यात मुक्तिपथच्या दारूमुक्त निवडणूक अभियानाला प्रतिसाद देत ३१९ गाव व ५५ वार्डातील जनतेनी लोकसभा निवडणूक दारूमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. तसे ठराव घेण्यात आले आहे. ठरावाची प्रत ग्रामपंचायत ठिकाणी व चौकात लावून दारूमुक्त निवडणुकीसाठी जाहीर आवाहन करण्यात येत आहे. गावात, वार्डात कोणत्याही प्रकारे दारू वाटू देणार नाही, बाटलीसाठी मत विकणार नाही असा निर्धार पुरुषांनी, तर नवऱ्याला दारू पाजणाऱ्या उमेदवाराला मत देणार नाही असा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे.
दारू व तंबाखू नियंत्रण हेतू गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथ अभियान सुरु असून या अभियानाच्या पुढाकारातून जवळपास ७०० च्या वर गावात अवैध दारू विक्री बंद आहे. निवडणूकीच्या काळात गावात दारू येण्याची संभाव्यता असते व दारूबंदी धोक्यात येते. दारूच्या मोफत उपलब्धतेची संधी साधून गावातील तरूण किंवा इतर पुरुष व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता असते. निवडणुकीच्या दिवसी भांडण व मारामारी होण्याची शक्यता असते. हे सर्व घडू नये यासाठीच मुक्तिपथ व शासनाच्या स्विप कार्यक्रमाद्वारे १२ हि तालुक्यात गावात व वार्डात विविध सभा घेऊन जागृती करण्यात येत आहे. शहराच्या ठिकाणी मोठे फलक लावले आहे. सभेमध्ये पोस्टर व माहिती पत्रक देऊन जागृती केली जात आहे.
आतापर्यंत जिल्हाभरात ३१९ गाव व ५५ विविध शहरातील वार्डानी दारूमुक्त निवडणूक करण्याचा ठराव पारित केला आहे. यामध्ये वडसा -१६ गाव ५ वार्ड, आरमोरी २५ गाव ४ वार्ड, कुरखेडा २१ गाव ५ वार्ड, कोरची १३ गाव व १ वार्ड, धानोरा २३ गाव व १ वार्ड, गडचिरोली ३० गावे व ३ वार्ड, चामोर्शी ४३ गावे व ८ वार्ड, मुलचेरा – १५ गावे, एटापल्ली ३५ गावे व ७ वार्ड, भामरागड २५ गावे व ८ वार्ड, सिरोंचा – ४० गावे व ५ वार्ड, अहेरी ३३ गावे व ८ वार्ड आदी गावांचा समावेश असून इतरही गावांमध्ये दारूमुक्त निवडणुकीचे ठराव घेणे सुरू आहे.
मुक्तिपथ व गाव संघटनेच्या वतीने लोकांना दारूमुक्त निवडणुकीचे फायदे व नुकसान पटवून दिले जात आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )