The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया / महाविकास आघाडीचे उमदेवार डाॅ. नामदेवराव किरसान यांच्या प्रचारासाठी अहेरी तालुक्यातील राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या आदिवासी बहुल कोकापर्री येथे काँग्रेस नेते कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली काॅर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती, विधानसभा निरीक्षक अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी उपस्थित होते.
दरम्यान काॅर्नर सभेला उपस्थित नागरिकांना येत्या १९ तरीखेला होणाऱ्या गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते तथा काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या दुसऱ्या क्रमांकावर आसलेल्या पंजा या चिन्ह समोर बटण दाबून प्रचंड बहुमताने विजय करण्यात यावे असे आवाहन अजय कंकडालवार यांनी केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम, माजी जि.प.सदस्य सुनीत कूसनाके, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगर पंचायत अहेरी, भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, सिनु राऊत, सचिन पांचार्यासह गावातील नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.