The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : येत्या1 १९ एप्रिल रोजी गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदार संघामध्येमतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदानासाठीची संपूर्ण तयारी निवडणूक यंत्रणेने पोलीस प्रशासनासोबत पूर्ण केलेली आहे. संपूर्ण लोकसभा मतदार संघात 1891 मतदान केंद्रावर 1618690 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 814763 पुरूष तर 802434 स्त्री तर 10 तृतीयपंथी मतदार आहेत.
लोकसभा मतदार संघात 16 क्रिटीकल मतदान केंद्रे आहेत. त्याठिकाणी केंद्रीय सुरक्षाकर्मी तैनात असणार आहेत. 25 ठिकाणी मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी मायक्रोऑबझरवर नियुक्त करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील 272 मतदान केंद्रावर व्हिडिओ ग्राफी तर इतर 475 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्याचे नियोजित आहे. मतदारसंघातील 1891 मतदान केंद्रावर आवश्यक प्रमाणामध्ये पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध झाली आहेत. यामध्ये 2307 BU, 2294 CU व 2431 VVPAT मतदानासाठी तयार करण्यात आली आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलतांना सांगितले, 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांग मतदारांना घरीच मतदान करण्याची सुविधा यावेळेस पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेचा लाभ घेत 1125 ज्येष्ठ नागरिक मतदारांनी, 3272 निवडणूक कर्तव्यावर नियुक्त मतदान पथक तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सुविधा केंद्रामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. 23 अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदान जागृती अभियानांतर्गत संपूर्ण जिल्हाभरामध्ये विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले त्यामध्ये जिल्ह्यातील अनेक महाविद्यालय व शैक्षणिक संस्था यामध्ये अठरा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मतदार यादी मध्ये नाव नोंदवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. मतदार जागृती अभियानांतर्गत मतदान करण्याबाबतची शपथ घेण्यात आली, रॅली रोड शो द्वारे जनजागृती करण्यात आली, आपल्या प्रत्येक मताची किंमत लोकशाहीची हिंमत कशी वाढवते याबाबत संदेश प्रसारित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग नोंदवला आहे.
प्रचाराची मुदत संपली
आज १७ एप्रिल २०२४ रोजी आमगाव,आरमोरी , गडचिरोली, अहेरी, विधानसभा मतदार संघासाठी दुपारी ३.०० वाजता तर ब्रम्हपूरी व चिमूरसाठी सायंकाळी ६.०० वाजता प्रचाराची मुदत संपली. या कालावधीनंतर उमेदवारांना तसेच राजकीय पक्षांना सार्वजनिक रित्या प्रदर्शित झालेले आपापले प्रचार साहित्य काढून घ्यावे लागेल. लॉऊडस्पिकर वापरण्यात परवानगी राहणार नाही. मतदारसंघाबाहेरील मतदार नसलेले राजकीय कार्यकर्ते, उमेदवार, उमेदवाराच्या प्रतिनीधी यांना वगळून इतरांना मतदारसंघात राहता येणार नाही. मात्र घरोघरी जाऊन प्रचार करणे अनुज्ञेय राहील. धार्मिक स्थ्ंळाचा वापर निवडणूक विषयक प्रचारासाठी करता येणार नाही. BulkSMS/ Voice Massages यावर बंदी. उमेदवार, उमेदवाराचा प्रतिनीधी, आणि उमेदवाराचे कार्यकर्ते/ पक्ष कार्यकर्ते यांना प्रत्येकी एक वाहन अनुज्ञेय राहील. एका वाहनामध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्ती अनुज्ञेय नाही. मतदान केंद्रापासून 100 मीटर आत मोबाईल वापरण्यास बंदी आहे. साध्या पांढऱ्या कागदावर मतदार चिठ्ठी देता येईल. यावर उमेदवाराचे अथवा पक्षाचे नाव/ चिन्ह वापरता येणार नाही. मतदान केंद्रापासून 100 मीटर आत कुठलेही बॅनर पोस्टर अथवा प्रचार साहित्य आणता येणार नाही. ज्या व्यक्तीला Z+ सुरक्षा कवच दिलेले आहेत. अश्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर कुठल्याही व्यक्तीला सुरक्षा रक्षकासह मतदान केंद्रावर प्रवेश करता येणार नाही.
आचारसहिंता भंगाच्या 18 तक्रारी
मतदारसंघामध्ये 6 आचारसहिंता पथके, 30 फिरते पथके, 23 स्थिर सर्वेक्षण पथके ,29 व्हिडीओ सर्वेक्षण पथके,9 व्हिडीओ निरिक्षण पथके, बॉर्डर चेकपोस्ट 23 कार्यरत आहेत.
आचारसहिंता भंगाच्या एकूण 18 तक्रारी प्राप्त झाल्या चौकशी अंती 8 तक्रारी मध्ये तथ्य आढळून आले नाही. 10 तक्रारीमध्ये कार्यवाही करण्यात आली व 3 प्रकरणामध्ये फौजदारी कार्यवाही करण्यात आली आहे. फिरत्या पथकामार्फत 11,00,100/- रुपये जप्त करण्यात आले. 60494.76 लीटर इतकी अवैध दारू पकडण्यात आली .
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक
मतदानापूर्वीचा एक दिवस (18 एप्रिल) आणि मतदानाच्या दिवशी (19 एप्रिल) मुद्रीत माध्यमादवारे (प्रिंट मिडीया) प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. प्रिंट मिडीयातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभुल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत.
मतदारांच्या मदतीसाठी मतदार चिठ्ठ्या घरोघरी वाटण्याचे काम मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करत आहेत. या मतदान चिठ्ठ्यावर मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती पुरविण्यात आलेली आहे. याचा वापर करून मतदार आपले मतदान केंद्र शोधून मतदान केंद्रा बाहेर उपलब्ध करून दिलेल्या सहाय्यकाच्या मदतीने मतदार यादी मध्ये आपले नाव शोधून मतदानाचा हक्क बजावू शकतो.
मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 8385 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी तसेच 228 क्षेत्रीय अधिकारी कर्तव्यावर असणार आहेत.
मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना
16 एप्रिल पासून मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना झाली आहेत. या मतदारसंघांच्या ठिकाणाहून आतापर्यंत 462 मतदान पथके महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस, शासकिय व खाजगी जीप तसेच भारतीय वायूसेनेच्या 7 हेलिकॉप्टरने आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाली आहेत. आतापर्यंत अहेरी विधानसभा मतदारसंघातील 65, आरमोरीतील 25, गडचिरोलीतील 12 मतदान पथके इंटरमेडिएट बेस कॅम्प ला पोहोचली आहेत.
मतदान पथकांच्या सुरक्षेसह, त्यांना उष्णतेचा तसेच आरोग्याच्या समस्यांचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. याच्यासाठी त्यांच्या साहित्यासोबत प्राथमिक उपचाराचा औषधाचा साठा देण्यात आला आहे. त्यासह मतदान पथकांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणाच्या जवळपासच्या सर्व शासकीय आरोग्य सुविधा तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन प्रसंगांमध्ये सर्व प्रकारच्या शासकीय आरोग्य सुविधा पुरवण्या साठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी निवडणुकीच्या कालावधीमध्ये एअर ॲम्बुलन्स सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतदानाच्या दिवशी सुट्टी
मतदानाच्या दिवशी मतदान करता यावे यासाठी मतदारांना सुट्टी देण्याबाबत खाजगी व शासकीय आस्थापनांना कळविण्यात आले आहे. मतदाना नंतर मतदान पार पडलेल्या मतदान यंत्रासह संविधानिक लिफाफे कृषी महाविद्यालय येथील सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार आहेत. सदर सुरक्षा कक्षाला निवडणूक विभागाचे सील यासह उमेदवार सुद्धा आपले स्वतःचे सील लावू शकेल. तसेच सुरक्षा कक्षाच्या बाहेर उपलब्ध करून दिलेल्या मंडपातून उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी सीलबंद सुरक्षा कक्षाचे निरीक्षण करू शकतील.
मतदानाच्या दिवशी वृद्ध महिला तसेच नवीन मतदार यांना मतदार मित्र (मतदार दोस्ताल) म्हणून MSW, NSS चे 840 विद्यार्थी मदत करणार आहेत.
त्यासोबतच महिला मुली यांना मदत करण्यासाठी मतदार सल्लेख (भगिनी ) म्हणून 530 मुली (MSW, NSS ) मदत करणार आहेत.
आशा वर्कर अंगणवाडी सेविका महिला बचत गट यांच्या मतदान वाढीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे .
दिव्यांग व्यक्तीला मदत करण्यासाठी दिव्यांग दुताचे नेमणूक करण्यात आली आहे. 150 दिव्यांग दूत हे दिव्यांग शाळेचे कर्मचारी आहेत ते हे काम पाहणार आहेत.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #loksabhaelection2024 #loksabha_election2024 )