The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : तालुक्यातील कुंभीटोला घाटावरून अवैधरित्या रेतीची वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टर जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी पकडल्याची कारवाई काल २५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
जिल्हात अवैधरित्या मोठया प्रमाणात रेती ची वाहतुक केली जात असल्याने महसुल बुडत आहे. अशातच जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे यांनी अवैध रेती तस्करीवर आळा घालण्याकरीता मोहीम हाती घेतली असुन कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला घाटावरून अवैधरित्या रेतीची वाहतुक होत असल्याबाबत त्यांना कळाले असता काल २५ एप्रिल रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी पहाटे कुंभीटोला रेती घाटावर भेट दिली. यावेळी अवैध रेती वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टर आढळुन आले. त्यावर कारवाई करत दोन चालकांनाही ताब्यात घेतल्याचे कळते. दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालय कुरखेडा येथे जप्त करण्यात आले आहे. सदर करावाईने अवैध रित्या रेती ची वाहतुक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. स्वत: जिल्हा खनिकर्म अधिकारी हे रेती घाटावर भेट देवून कारवाई करीत असल्याने रेती चोरटे सावध झाले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #kurkheda #kumbhitola #crimenews)