देसाईगंज येथे १८८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

158

– संत निरंकारी मंडळाव्दारे भव्य रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : संत निरंकारी मंडळ शाखा-वडसा (देसाईगंज) च्या वतीने आज २६ एप्रिल रोजी संत निरंकारी सत्संग भवन, आरमोरी रोड, देसाईगंज (वडसा) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यांत आले होते. या रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद पहावयास मिळाला असुन यात १६४ पुरूष व २४ महिला असे एकूण १८८ रक्तदात्यांनी स्वयंस्फृर्तीने रक्तदान केले.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते व किशन नागदेवे, झोनल इंचार्ज, संत निरंकारी मडळ वडसा/नागपूर झोन यांचे अध्यक्षतेखाली तसेच आसाराम निरंकारी, संयोजक, हरिश निरंकारी, क्षेत्रीय संचालक, सेवादल, नरेश विठलानी, अध्यक्ष, साईबाबा मंदिर, डॉ. अशोक तुमरेडी, रक्तपेढी, गडचिरोली, सतीश ताडकलवार यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. रक्तदानासारखे ईश्वरीय कार्य संत निरंकारी मंडळाची ओळख झाली आहे असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी यावेळी व्यक्त केले.
रक्तपेढी जिल्हा रूग्णालय, गडचिरोली यांनी रक्ताची टंचाई उद्भवल्यामुळे मंडळाला रक्तदान शिबीरासाठी विनंती करताच मंडळाद्वारे मानव सेवेसाठी तातडीने रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याचे किशन नागदेवे यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात सांगितले.
संत निरंकारी मंडळाद्वारे २४ एप्रिलला सदगुरू बाबा गुरबचनसिंहजी महाराज तथा अन्य हुताम्यांना श्रद्धांजली देण्यासाठी ‘मानव एकता दिवस’ साजरा करण्यांत येतो व त्याच दिवशी सर्व जिल्हा केंद्र किंवा इतर मुख्य ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करून रक्तदान करून श्रद्धांजली दिली जाते. व त्यांनतर सर्व विश्वभरात आवश्यकता व सोईनुसार रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत येते.
रक्त संकलनासाठी रक्तपेढी, सामान्य रूग्णालय, गडचिरोली येथील चमुंनी परिश्रम घेतले. स्थानीक ग्रामीण रूग्णालय, वडसाचे रक्त तपासनी चमुनी सर्व रक्तदात्यांची तपासणी केली. रक्तदान शिबीराला यशस्वी करण्यासाठी सेवादलचे सर्व स्त्री-पुरूष सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन नानकराम कुकरेजा, संचालक सेवादल यांनी तर आभार पुरुषोत्तम डेंगानी यांनी मानले. रक्तदानासाठी उत्तम व्यवस्था करण्यांत आली होती. शिबिराला यशस्वी करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल किशन नागदेवे, झोनलइंचार्ज यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #kurkheda #kumbhitola #crimenews #muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here