गडचिरोली : रोजगार हमीची थकीत मजूरी मजूरांच्या खात्यावर जमा

1280

-शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याला यश
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विविध कामे हातात घेण्यात आली असून मागील चार महिन्यांपासून या कामावरील मजूरांना मजूरी मिळाली नसल्याने होळीसारखा महत्वाचा सण अंधारात गेला आहे. त्यामुळे आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून रोजगार हमी योजनेच्या मजूरांची मजूरी तातडीने मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या पाठपुराव्यामुळे जिल्हाभरातील रोजगार हमीच्या कामावरील मजूरांची थकीत असलेली ३० कोटींहून अधिकची मजूरी रक्कम मजूरांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना १२ एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, सध्या लग्नसराई चे दिवस सुरू झालेले आहेत. मात्र रोजगार हमीच्या कामावर राबून चार महिने झाल्यानंतरही मजूरीचा रुपयाही मजूरांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रोजगार हमीच्या मजूरांकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आहे. त्यामुळे आपण प्राधान्याने याकडे लक्ष द्यावे. व दर आठवड्याला मजूरी देणे बंधनकारक असतांनाही चार महिण्यांचा विलंब झाल्याच्या कारणास्तव अतिरिक्त रक्कमेसह तातडीने जिल्ह्यातील सर्व मजूरांची थकीत मजूरी वाटप करावी. याबाबत प्रशासनाने दखल घेत १४ एप्रिल पर्यंतची संपूर्ण मजूरी मजूरांच्या खात्यावर जमा करणे सुरू केले आहे.
थकीत मजूरी मिळाल्याने जिल्हाभरातील रोजगार हमी योजनेच्या मजूरांनी शेतकरी कामगार पक्ष आणि जिल्हाधिकारी संजय दैने यांचे आभार मानले आहेत.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #ramdasjarate #shetkarikamgarpaksh #shekaap )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here