The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २९ : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव ता.धानोरा येथे वर्ग सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाज निरोप समारंभ मुख्याध्यापक काळबांधे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच आयोजित करण्यात आला. यावेळी मंचावर शाळेतील शिक्षक कोल्हे, शिक्षिका सौ.उषा बोरकर, कुमारी वर्षा नाकाडे व येरंडी शाळेचे मुख्याध्यापक जुमनाके उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना समोर आयुष्यात येणारे विविध आव्हान व ते सोडवण्यासाठीचे विविध मार्ग याबाबत मार्गदर्शन केले. पुढील आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना श्रम, चिकाटी व अभ्यासाने करण्याचा निर्धार सातवीतील विद्यार्थ्यांनी केला. वर्ग सातवीतील विद्यार्थ्यांना शाळेतर्फे जनरल नॉलेज २०२४ ची पुस्तिका व पेन ,नोटबुक भेट म्हणून देण्यात आले. तसेच वर्ग सातवीतील विद्यार्थ्यांनी शाळेविषयी बांधिलकी जपून स्वतः वर्गणी करून शाळेसाठी आवश्यक असणारी मोठी प्लेट भेट म्हणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना नाश्त्याचा आस्वाद घेण्यात आला. वर्ग सहावीतील कु.जागृती आतला नी सूत्रसंचालन केले तर कु वैष्णवी पदा हिने आभार मानले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora)
