The गडविश्व
चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावर असलेल्या लोहारा नजीक चालत्या खासगी ट्रॅवल्सने पेट घेतल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात जिवीतहाणी टळली असून ट्रॅवल्सचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर वरून गडचिरोली येथे जाणारी ट्रॅवल्स लोहारा गावानजीक पोहचली या दरम्यान ट्रॅवल्समधून धूर निघतांना निदर्शनास आले. पाहता पाहता ट्रॅवल्सने अचानक पेट घेेतला मात्र सुदैवानी यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र ट्रॅवल्समालकाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.