The गडविश्व
गडचिरोली, दि.०१ : स्थानिक विदर्भ इंटरनॅशनल स्कूल तथा पोद्दार जम्बो किड्स येथे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेच्या प्राचार्या नेहरिका मंदारे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशासकीय अधिकारी प्रीति मुंढे यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाची सुरूवात शाळेच्या प्राचार्या नेहरिका मंदारे यांच्या हस्ते ध्वजवंदन करून करण्यात आली. त्यानंतर “जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा” हे राज्य गीत शाळेतील संगीत शिक्षक प्रणय, सपना व त्यांचे सहकारी यांनी अभिमानाने गाऊन कार्यकर्माची शोभा वाढवली. शाळेतील हिंदी शिक्षिका प्रणोती बनकर यांनी आपल्या मधुर वाणीतून महाराष्ट्र दिनावर प्रकाश टाकला तसेच महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरे विषयी सर्वांना अवगत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन राठोड यांनी केले तर आभार काजल सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक पर्यवेक्षक प्रशांति वाघमारे व चमू यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी शैक्षणिक स्तर प्रमुख प्रतिभा कावळे, रुतिका मामीडवार, नूरसभा सय्यद उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #maharashtradin #1st May)