The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील नदी परिसरात गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कृती करीत 3 ड्रम गूळ सडव्यासह 20 लिटर दारू नष्ट केली.
वांगेपल्ली परिसरातील अवैध दारूविक्री बंदीसाठी पोलिस विभाग व गाव संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तरीसुद्धा काही मुजोर विक्रेते जंगलपरिसर किंवा नदीशिवाराचा आधार घेऊन हातभट्टी लावून दारू गाळतात. संबंधित दारूविक्रेत्यांना गाव संघटनेच्या माध्यमातून सूचना करूनही त्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला नाही. अशातच वांगेपल्ली येथिल नदीच्या मध्य भागात अवैध गुळाची दारू काढली जाते, अशी माहिती प्राप्त झाली. माहितीच्या आधारे गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने शोधमोहीम घेतली असता, विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी हातभट्या लावल्याचे दिसून आले. जवळपास ३ ड्रम गुळाच्या सडव्यासह २० लिटर दारू, दारू गाळण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले.
(#thegev #gadchirolinews #muktipath)