The गडविश्व
गडचिरोली, दि.०५ : चामोर्शी तालुक्यातील व पोटेगाव पोलिस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या गिलगाव येथील विक्रेत्यांकडून ३० लिटर मोहफुलाची दारू जप्त करून दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस, गावातील महिला व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त केली.
गिलगाव येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंच रेखा आलाम यांच्या अध्यक्षतेखाली गावातील महिलांची बैठक पार पडली. यावेळी गावातील दारू विक्री बंद करण्याबाबत चर्चा करण्यात आली. गावात दारू विक्री सुरु असल्याने अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, अनेक युवक दारूच्या आहारी जात असून त्यांचे शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. यासाठी गावातील दारू विक्री बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायने घेतला. यासंदर्भातील निवेदन पोलिस मदत केंद्र पोटेगावं येथे देण्यात आले. त्यानंतर 1 मे ला मुक्तीपथ टीमने गावातील महिलांची बैठक घेऊन दारू विक्रेत्यांना नोटीस देण्यात आले. तसेच दोन दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करीत 30 लिटर दारू पकडण्यात आली व पोटेगाव पोलिस मदत केंद्र येथिल कर्मचाऱ्यांना बोलावून 2 दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी मुक्तीपथचे विनोद पांडे, आनंद सिडाम, तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग मोगारकर व गावांतील महीला उपस्थित होते. विशेष म्हणजे, गावातून अवैध दारूविक्री बंदीसाठी महिलांकडून अथक परिश्रम घेतले जात आहेत. गावातील महिला दारू विक्रेत्यांवर वॉच ठेवून असून मुजोर दारू विक्रेत्यांवर पोलिस विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)