धानोरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिवाकर भोयर यांची निवड

483

– सचिवपदी सिताराम बळोदे
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि.०८ : धानोरा आदर्श पत्रकार संघाची बैठक समिर कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवून त्यानंतर नविन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
नव्या कार्यकारिणीत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिवाकर भोयर, सचिवपदी सिताराम बळोदे, उपाध्यक्षपदी शरिफ कुरेशी, कोषाध्यक्षपदी श्रावन देशपांडे, मार्गदर्शक मारोति भैसारे, प्रसिद्धि प्रमुख बंडू हरणे यांची निवड करण्यात आली तसेच सदस्य म्हणून समिर कुरेशी, भाविकदास करमरकर, ओम देशमुख, देवराव कुनघाडकर, बाळू बोरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
सभेचे संचालन व आभार भाविकदास करमरकर यांनी मानले.
दिवाकर भोयर यांची धानोरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर पत्रकार बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora #diwakarbhoyar )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here