तेंदुपत्ता संकलन करतांना वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

1631

– वाघाच्या दहशतीने तेंदुपत्ता संकलन धोक्यात
The गडविश्व
मूल, दि.०९ : तेंदुपत्ता संकलन करतांना आणखी एक जण वाघाचा बळी ठरल्याची घटना मूल तालुक्यात आज ०९ मे रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. तुळशिराम सुरेश सोनुले (वय ३४) रा. रत्नापूर असे वाघाचा हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
मूल तालुक्यात अनेक गावे जंगलाशेजारी असल्याने तेथील नागरिक तेंदुपत्ता तोडणी करून काही पैसे कमावतात. सध्या तेंदुपत्ता तोडणीचा हंगाम सुरू आहे. तालुक्यातील रत्नापुर येथील काही नागरिक तेंदुपत्ता तोडणीसाठी भादुर्णा जंगल परिसरात गेले होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने तुळशिराम सोनुले यांच्यावर हल्ला करून नरडीचा घोट घेत ठार केले. जवळच असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केल्याने वाघाने धूम ठोकली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मृतकाच्या पच्छात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असून घरचा कमावत्याचा असा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान वाघाच्या दहशतीने तेंदुपत्ता संकलन धोक्यात आले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चार दिवसांपूर्वीच पेटगाव नजीकच्या बाम्हणी माल जंगल परिसरात तेंदुपत्ता संकलन करताना वाघाच्या हल्ल्यात महिलेचा बळी गेल्याची घटना घडली होती. आता पुन्हा त्याचा परिसराच्या जवळपास ही घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
(#thegdv #thegadvishva #tigerattack #chandrpuenews #forest #tadobaforest #mul #ratnapur )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here