गडचिरोली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुणाऱ्या आरोपीस २५ वर्षे कारावास

1750

– गडचिरोली येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, दि.०९ : मच्छी आणायला बाजारात जाऊ म्हणुन फुस लावून बाजारातुन परत येत असतांना अल्पवयीन मुलीवर बलात्कारी करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम. मुधोळकर यांनी २५ वर्ष सश्रम कारावास व एक लाख रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे.
शंकर सुधाकर टिंगुसले (वय ३४) रा. विकेकानंद नगर, गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. २७ जानेवारी २०२० रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीस मच्छी आणायला बाजारात जाऊ म्हणुन फुस लावून नेले व बाजारातुन परत येत असतांना एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्यानंतर आणखी काही दिवस पीडितेला धमकी देऊन वारंवार बलात्कार केला. दरम्यान पीडिता ही गर्भवती राहिल्याने पीडितेने संपूर्ण आपबिती आईस सांगितली. यावेळी पीडितेच्या आईने ५ सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन गाठून तोंडी रिपोर्ट दिली. त्यावरून पोस्टे गडचिरोली येथे अन्वये कलम ३७६ (२) (एफ), (आय), (जे), ३७६ (३), ५०६ भादवी तसेच सहकलम ४,५,६, बाल लैंगीक अत्याचार अधिनियम २०१२, कायदयान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस ०६ स्पटेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली. तपास पूर्ण करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन खटला सत्र न्यायालयात चालवुन फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून आज ०९ मे २०२४ रोजी आरोपी शंकर सुधाकर टिंगुसले यास विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, उत्तम एम. मुधोळकर गडचिरोली यांनी कलम ३७६ भादवी, सहकलम ४,६ बाल लैंगीक अत्याचार अधिनियम २०१२ मध्ये दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावास व ७५ हजार रूपये दंडाची शिक्षा, कलम ५०६ भादवी मध्ये दोषी ठरवुन ०५ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास म. सहा. पोलिस निरीक्षक पुनम प्रकाश गोरे पोस्टे गडचिरोली यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #gadchirolipolice )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here