गडचिरोली : IPL ऑनलाईन सट्टयाच्या गुन्ह्यामध्ये आणखी दोघांना अटक

885

जिल्ह्यात खोलवर पसरले IPL सट्ट्याचे जाळे
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : जिल्ह्यात आयपीएल ऑनलाईन सट्टयाच्या गुन्ह्यामध्ये आणखी दोघांना अटक केल्याची कारवाई ८ मे रोजी करण्यात आली. शेख जमशेद पाशा बशीर शेख (वय ३२) रा. बिबरा पो. दहिगाम तह. शिरपूर जि. आसिफाबाद (तेलंगणा) वरवि लसमय्या गडीरेड्डी (वय २८) रा. मुत्तमपेठ तह. कवटाला, जि. कुमरामभिम (तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना दिलेले आहेत.
त्या पाश्र्वभुमीवर २७ एप्रिल २०२४ रोजी पोस्टे अहेरी हद्दीतील आय.पी.एल. सट्टा खेळवणार्या बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीसांनी विशेष मोहिम राबवुन अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारला असता, बनावटी ॲपच्या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा जुगार खेळवित असल्याचे दिसुन आल्याने घटनास्थळावरुन निखील दुर्गेे व आसिफ शेख यांच्या ताब्यातुन चार मोबाईल फोन व ९ हजार ४२० रुपये असा मुद्देमाल मिळुन आला होता. तसेच सदर गुन्ह्राचा अधिक तपास केल्यानंतर निखील मल्लया दुर्गेे, आसिफ फकीर मोहम्मद शेख, धंनजय राजरत्नम गोगीवार, निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण, इरफान ईकबाल शेख सर्व रा. अहेरी, संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली या दहा जणांविरुद्ध पोलिस स्टेशन अहेरी येथे कलम ४२० भादवी. सह कलम ४ व ५ महाराष्ट्र जुगार बंदी कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदर गुन्ह्राचा अजुन बारकाईने तपास केला असता, आणखी आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने अपर पोलीस अधीक्षक अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि अहेरी दशरथ वाघमोडे यांनी ८ मे रोजी तेलंगणा राज्यातून स्थानिक पोलीसांच्या मदतीने विशेष मोहिम राबवून ऑनलाईन सट्टा चालविणारा बुकी शेख जमशेद पाशा बशीर शेख, रा. बिबरा पो. दहिगाम तह. शिरपूर जि. आसिफाबाद (तेलंगणा) व रवि लसमय्या गडीरेड्डी, रा. मुत्तमपेठ तह. कवटाला, जि. कुमरामभिम (तेलंगणा) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोस्टे अहेरी येथे गुन्ह्रात दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे सा.यांच्या नेतृत्वात, पोलीस निरीक्षक पोस्टे अहेरी. दशरथ वाघमोडे, सपोनि. विजय चव्हाण, मपोउपनि. करीश्मा मोरे, पोउपनि. साखरे, पोउपनि. मरस्कोल्हे सह पोहवा./लोहंबरे, पोहवा शेंडे, पोअं पानेम, मपोअ.कुमराम व चापोअं सिडाम यांनी पार पाडली. यावेळी संपूर्ण जिल्हयातील नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजी पासुन दुर राहुन जर कोणी असे अवैध व्यवसाय चालवित असतील त्यांची माहिती पोलीस विभागाला देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले आहे.
(#thegdv #thegadvishva #crimenews #gadchirolinews #gadchirolipolice #ipl2024 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here