६१ रुग्णांची सर्च रुग्णालयात मेंदुविकार आरोग्य तपासणी

146

The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : सर्च रुग्णालयात दर महिन्याच्या दुसर्‍या गुरुवारला निजोजित असलेली मेंदूविकार ओपीडी ही दिनांक ०९ मे २०२४ रोजी घेण्यात आलेली होती. मेंदूविकारतज्ञ डॉ. निरज बाहेती नागपूर यांचेद्वारे एकूण ६१ मेंदूविकार आजार असलेल्या रुग्णांची तसेच मिरगी, फिट येणे ( एपिलेप्सी) आजार असलेल्या ८ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
मेंदूविकार ओपीडी मध्ये स्ट्रोक (अर्धांगवायू, पॅरालिसिस) बरोबरच झटक्यांचा (मिरगी) आजार, विविध मज्जातंतूचे आजार, पार्किंन्सन आजार, अल्जायमर आजार, जुनाट डोकेदुखी, लहान मुलांचे मेंदूचे आजार, एपिलेप्सी, चक्कर येण्याचे अनेक आजार, मद्यपानामुळे होणारे मेंदूविकार अशा अनेक आजारांवर सल्ला व उपचार देण्यात आले.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. मेंदूविकार ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५० टक्के सवलत देण्यात आली. तसेच मिरगी, फिट येणे ( एपिलेप्सी) या आजाराच्या रुग्णांना प्रयोगशाळा तपासणी व औषधी या १०० टक्के मोफत देण्यात आले. विशेष म्हणजे १५ वर्षाखालील लहान मुलांना सर्च रुग्णालयात कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नोंदणी फी, प्रयोगशाळा तपासणी, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी या १०० टक्के मोफत दिल्या जातात. सर्च रुग्णालयात होणार्‍या विशेषज्ञ ओपीडीचा रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे. तसेच येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे असेही कळविले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here