– आई आणि बाळ दोघेही सुखरुप
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा-कोरची, दि. १५ : जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. तर अनेकदा खड्ड्यांमुळे अपघात झाल्याच्याही घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र ते खड्डे कधी कधी फायद्याचे ठरतात. त्याचा प्रत्यक्ष अनुभव एका महिलेसोबत सोबत घडला आहे. कोटगुल येथून एका गरोदर महिलेस रुग्णवाहिकेतून कोरची येथे नेत असताना रुग्णवाहिका ही खड्ड्यात गेली आणि त्याच वेळी त्या महिलेची डिलीव्हरी झाल्याची घटना पुढे आली आहे.
कोरची तालुक्यातील कोटगुल नजीकच्या देऊळभट्टी येथील लता मुकेश कोरेटी ( वय २९ ) ही गरोदर होती. ८ महिने झाले असताना डिलीव्हरी ला आणखी वेळ आहे असे समजून घरचे लोक बिनधास्त होते. दरम्यान सकाळच्या सुमारास लता च्या प्रसव कळा सुरु झाल्यामुळे तिला कुटुंबीयांनी कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चौधरी आणि डॉ. नाकाडे यांनी तपासणी करुन तिला तत्काळ गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. रुग्णवाहिकेने त्या महिलेस कोटगूलहून कोरची कडे नेत असताना रुग्णवाहिका बेतकाठी ते पांढरीगोटा गावादरम्यानच्या टेकडावर आली आणि खड्ड्यात गेली. गाडी जशी खड्ड्यात गेली त्यावेळी त्या महिलेची डिलीव्हरी झाली. सोबत असलेल्या नातेवाईकांनी गाडी थांबवायला लावून महिलेच्या पोटाला हात लावून पाहिले असता डिलीव्हरी झाली होती. त्यानंतर तुला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यमुळे महिलेची सुखरूप डिलीव्हरी झाली असली तरी तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असल्याने त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी प्रशासन का बरं घेत नाही आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #acbmaharashtra )