The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १६ : तालुक्यातील सोनसरी येथील महिला पोलीस पाटील यांना कर्तव्य बजावत असताना मज्जाव करीत हूज्जत घालून मारहाण करणाऱ्या दोन आरोपीना अटक करण्यात करण्यात आली होती. न्यायालयाने आता दोघांचीही रवानगी तुरुंगात केली आहे.
सोनसरी येथील तलावात मागील महिण्यात एका इसमाचा बुडून मृत्यु झाला होता. सदर माहिती मिळताच महिला पोलीस पाटील वालदे व कोतवाल फिरोज हलामी घटणास्थळाकडे जात असताना गावातीलच आरोपी दिलीप बाबूराव मडावी (वय ४१) व महेश दिलीप मडावी (वय २२) या बापलेकांनी तिला रस्त्यातच गाठत तु गावातील माहीती पोलीसांना देते असे मनत अश्लील शब्दात शिवीगाळ करीत मारहाण केली अशी तक्रार महिला पोलीस पाटील यांनी कुरखेडा पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. या तक्रारीवरून आरोपी विरोधात भादवि ३५३,३३२,२९४,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी फरार होते. सदर आरोपींचा गोपनीय माहीतीचा आधारे शोध घेत अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान न्यायलयाने त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत चंद्रपूर कारागृहात केली आहे.
सदर कार्यवाही ठाणेदार रेवचंद सिंगनजूडे यांच्या नेतृत्वात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे, हवालदार शेखलाल मडावी यांनी केली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #kurkheda )