– गळफास घेण्याचे कारण गुलदस्त्यात
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : दोघे भेटले, गप्पा मारल्या, बिर्याणी ही खाल्ली नंतर दोघांनीही एकाच दोरीने गळफास घेतला. यात प्रियकराचा मृत्यू तर प्रेयसी थोडक्यात बचावल्याची खळबळजनक घटना आरमोरी शहरातील बर्डी परिसरात १६ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली. मात्र या घटनेतील प्रेमीयगुलाचा गळफास घेण्याचे कारण गुलदस्त्यात आहे. राहुल गजानन सावसागडे (वय २०) , रा. आरमोरी असे मृतकाचे नाव आहे.
गुरुवार १५ मे रोजी मृतक राहुल आणि त्याची प्रेयसी हे दोघे बर्डी परिसरातील एका महिलेच्या घरी दुपारच्या सुमारास भेटण्यासाठी एकत्रित आले. काही वेळ गप्पा मारून एका हॉटेलातून बिर्याणी मागवली आणि दोघांनी ते खाल्ली. त्यानंतर त्याच खोलिमधील स्लॅबच्या लोखंडी हुकला दोघांनीही एकाच दोरीने गळफास घेतला. यात राहुलचा मृत्यू झाला तर प्रेयसी बचावली. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून राहुलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तर तिला ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या उपचार सुरु आहे.
दोघानाही खोलीमध्ये असून खूप उशीर झाल्याने मित्रांनी फोन केला मात्र फोन न घेतल्याने संशय बळावला आणि त्यांनी सदर खोलीवर जाऊन पाहिले तर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर “त्या” महिलेने या दोघांना खोली कशी दिली असा प्रश्न उपस्थित होत असून पोलीस पुढील तपास करीत आहे. मात्र अद्याप घटनेमागील कारण कळू शकले नाही.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #armori #hanging #burdi #ipl2024 #loksabhaelection2024 )