-अहिंसक कृतीतून दाखवली एकी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २०: आरमोरी तालुक्यातील सालमारा येथील अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेत दारूविक्रेत्यांकडून पुन्हा दारूविक्री करणार नाही, असे वचन घेतले. सोबतच अहिंसक कृती करीत विक्रेत्यांच्या घर परिसरात व जंगलपरिसरात आढळून आलेली दारू, दारू गाळण्याचे साहित्य नष्ट करीत ग्रामस्थांनी अवैध दारूविक्रीविरोधात शक्तिप्रदर्शन केले.
सालमारा येथे ऑक्टोबर २०२३ ला मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गाव सघन भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मॅरेथॉन स्पर्धा, स्त्री आरोग्य शिक्षण, आपल्या मुलांना कॅन्सर पासून वाचवा, गाव बैठक घेऊन अवैध दारूविक्री बंद करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर गावातील दारू विक्रेत्यांकडून शपथपत्र लिहून घेण्यात आले. गाव संघटनेने आजपासून दारूविक्री बंद करावी, अशी ताकीद दिली. यामुळे काही महिने दारूविक्री बंद राहिली. परंतु, मुजोर दारू विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढत अवैध व्यवसाय पुन्हा सुरु केला. आता नुकतेच या गावात पुन्हा बैठकीचे आयोजन करून अवैध दारूविक्री विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गाव संघटना व ग्रामस्थांनी दारूविक्रेत्यांच्या घरी जाऊन दारू विक्रेत्यांकडून शपथपत्र लिहून घेत दारूविक्रेत्यांना आजपासून अवैध दारूविक्री बंद करण्याची ताकीद दिली. दारूविक्रेत्यानी सुद्धा शपथ घेत आपण अवैध व्यवसाय बंद करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, गाव संघटना, ग्रामस्थ व मुक्तिपथ तालुका चमूने अहिंसक कृती करीत जंगलपरिसरात सुद्धा शोधमोहीम राबविली, असता दारू गाळण्याचे साहित्य, १० लिटर दारू आढळून आली. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करून आपल्या गावातील अवैध दारूविक्री बंदीसाठी आपण सक्रिय असल्याचे ग्रामस्थांनी दाखवून दिले. यावेळी गाव संघटनेच्या अध्यक्ष कल्पना नारनवरे, काशिनाथ नारनवरे, पोलिस पाटील राजहंस वाकडे, वनिता वट्टी, पार्वता घरत, कुंदा कुमरे,मी यामिना तिजारे, विशाखा मडावी, वनिता भोयरमी शालू चुदरी, प्रेमीला मानकर, सुशीला जांभुळकर, पार्वता कुमरे, प्रभा मानकर, तुळशीदास मानकर, कुसुम कोलते, सरिता घरत, रविना वट्टी, मनोरमा वाकडे, योगिता मानकर, दीपिका कुमरे, कुंदा भोयर, अस्मिना भोयर, कालिदास वाकडे, लक्ष्मण मेश्राम, कल्पना मानकर, शशिकला कुमरे, अंबादास जांभुळकर, संपत मानकर, मुक्तिपथचे तालुका संघटक विनोद कोहपरे, प्रेरक स्वीटी आकरे, स्पार्क कार्यकर्ता दीक्षा तेल्कापल्लीवार, ब्लॉक प्लेसमेंटसाठी आलेल्या काजल साखरकर, दिव्या माडमवार उपस्थित होत्या.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )