दारू सोडण्यासाठी ३५ जणांनी घेतला उपचार

154

The गडविश्व
गडचिरोली, दि. २०: तालुक्यातील तालुक्यातील खरपुंडी व मेंढा येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तीपथतर्फे एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एकूण ३५ रुग्णांनी दारू सोडण्यासाठी उपचार घेतला.
मुक्तिपथतर्फे गावागावात व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन केले जात असल्याने रुग्णांना आपल्या गावातच उपचार मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक गावातील रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन दूर सारले आहे. अशातच गडचिरोली तालुक्यातील खरपुंडी व मेंढा येथील रुग्ण संख्या बघता गाव संघटनेच्या विनंती नुसार मुक्तिपथने व्यसन उपचार शिबिराचे आयोजन केले होते. या दोन्ही शिबिराच्या माध्यमातून एकूण ३५ रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
शिबिरात सपुदेशक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची तपासणी करून धोक्याची घटक व औषोपचार या विषयवार मार्गदर्शन केले तर संयोजक प्रभाकर केळझरकर यांनी पेशंटची केस हिष्ट्री घेतली. ग्रुप शेषन च्या माध्यमातून दारू सोडण्यासाठी उपाय सुचवले. शिबिराचे नियोजन मुक्तीपथ तालुका संघटक रेवनाथ मेश्राम, प्रेरक मेघा गोवर्धन, स्पार्क कार्यकर्ता बुधाबाई पोरटे, प्लेसमेंट विद्यार्थी मयूर बारसगडे, जयश्री मलगाम यांनी केले. गावातील ग्रा. प.सदस्य खरपुंडी वामन टीकले तसेच मेंढा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय मडावी यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here