The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : तालुक्यातील चांदाळा-रानमुल-माडेमुल जंगल परिसरात अहिंसक कृती करीत २ लाख १७ हजार रुपये किंमतीचा जवळपास ४३ ड्रम मोहफुलाचा सडवा केल्याची कृती गडचिरोली-धानोरा तालुका मुक्तीपथ चमू व गाव संघटनेनी संयुक्तरित्या केली.
चांदाळा, रानमुल, माडेमुल जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू काढून परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा केला जातो. यामुळे अवैध दारूविक्री बंदी असलेल्या गावातील लोक आसपासच्या गावातील विक्रेत्यांकडे जाऊन दारू पितात. या गावातील दारू विक्रेत्यांवर पोलिस विभागाच्या माध्यमातून कारवाई करूनही त्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला नाही. अशातच जंगलपरिसरात विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी हातभट्टी लावली असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गाव संघटना व धानोरा, गडचिरोली मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या जंगलापरिसरात शोधमोहीम राबविली असता, वेगवेगळ्या ठिकाणाहून दारूभट्टी उध्वस्त केली. यावेळी घटनास्थळावरून आढळून आलेला 2 लाख १७ हजार रुपये किमतीचा जवळपास ४३ ड्रम सडवा व साहित्य जप्त करीत जंगलातच नष्ट करण्यात आला.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )