The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २४ : इयत्ता बारावीचा नुकताच २१ मे रोजी निकाल महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात कुरखेडा येथील भुमिका अशोक माखीजा ह्या विद्यार्थिनीने ९३.५० टक्के गुण प्राप्त केले आहे.
भुमिका ही कुरखेडा येथील रहिवासी असून नागपुरातील आंबेडकर महाविद्यालयात इयत्ता १२ वी चे शिक्षण घेत होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागाद्वारे फेब्रुवारी २०२४ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आलेली होती. त्या परीक्षेचा निकाल २१ मे २०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला. या निकालात भुमिका माखीजा हिने ९३.५० टक्के गुण प्राप्त केले आहे. तिने आपल्या या यशाचे श्रेय शिक्षकवृंद, आई वडील यांना दिले असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होता आहे.
(#thegdv #thegadvishva #kurkheda #hscexam )