-शाळेचा ९४.२८ टक्के निकाल
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २५ : तालुक्यातील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा रांगी येथील कलाशाखेतून ३५ विद्यार्थी इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसले. त्यापैकी ३३ विद्यार्थि उत्तीर्ण झाले असुन शाळेचा निकाल ९४.२८ टक्के लागला.
शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा रांगी शाळेतुन कुणाल जनार्दन बांबोडे हा विद्यार्थी शाळेतून प्रथम आला असून त्याला ६०० पैकी ४६६ गुण मिळवित गुणांची टक्केवारी ७७.३३ टक्के ऐवढी आहे. द्वितिय क्रमांकावर प्रांजली हरिदास कोवा ६०० पैकी ४३८ गुण मिळवित गुणांची टक्केवारी ७३.०० टक्के ऐवढी आहे. तृतिय स्थानि कुणाली विकास काटेंगे हिने ६०० पैकी ४३६ गुण प्राप्त करून ७२.६७ टक्के गुण मिळविले आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन होत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora #hscresult)