कुरखेडा : स्कॉर्पिओच्या ‘त्या’ भीषण अपघातातील चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

1485

– नागपुरात सुरू होते उपचार
The गडविश्व
कुरखेडा, दि. २९ : तालुक्यातील भाविक शिर्डी, शेगाव येथून देवदर्शन
करून स्वगावी येत असताना त्यांच्या स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना २६ मे रोजी पहाटेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील आंबेटाकळी ते बोरी अडगाव रस्त्यावर घडली. यात यात देवराव रावजी भंडारकर (६०) रा. कुंभीटोला हे जागीच ठार झाले तर ६ जण गंभीर जखमी त्यांच्यावर अकोला व खामगांव येथे उपचार सुरू होते. दरम्यान तिथून काहींना नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या मृत्यूशी झुंज देत असलेल्या समृध्दी कुंभलवार (वय ३) या चिमुकलीचा आज सकाळी ०८:०० वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आहे. तर इतरांवर सध्या उपचार सुरूच आहे.
शुक्रवारी २४ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथील देवराव रावजी भंडारकर, कांता देवराव भंडारकर व कुरखेडा येथील जयश्री राऊत, रोशन कुंभलवार, चेतना रोशन कुंभलवार, मुलगी समृध्दी कुंभलवार, वाहन चालक म्हणून जयदेव नाकाडे रा. तळेगाव हे कुरखेडा येथील लोकेश लांजेवार यांच्या एम एच ३३ ए. सी २३६६ या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाने शिर्डी, शेगाव आदी देवस्थानात देवदर्शन घेण्यासाठी गेले होते. दरम्यान हे सर्वजण २५ मे रोजी शिर्डी आणि अन्य देवस्थानांचे दर्शन घेऊन परत येत असताना २६ मे रोजी पहाटेला बुलढाणा जिल्ह्यातील आंबेटाकळी ते बोरी अडगाव रस्त्यावर अपघात झाला. अपघातात देवराव रावजी भंडारकर यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर ६ जण रुग्णालयात उपचार घेत होते. अपघातातील तीन वर्षीय समृध्दी रोशन कुंभलवार हीची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात होते. मात्र उपचाराअंती तिचीही प्राणज्योत मालावली आहे. सदर घटनेने कुरखेडा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #roadaccident #scrpioaccidentkurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here