The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. ३० : तालुक्यातील मोहली येथिल माँडेल स्कुल च्या तुषार लिकेश्वर पटले या विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४३३ गुण मिळवित शाळेतुन प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी ८६ एवढी आहे.
शाळेच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. धानोरा तालुक्यात एकमेव असलेल्या इंग्रजी माध्यमातील माँडेल स्कुल मोहली येथुन ३६ विद्यार्थि परिक्षेला बसले होते. यापैकी रांगी येथिल तुषार लिकेश्वर पटले या विद्यार्थ्याने शाळेतुन प्रथम क्रमांक पटकावला. शाळेक्या वर्ग १० वी चा निकाल १०० टक्के लागला. शाळेतील ३६ पैकी ३६ विद्यार्थि पास झाले आहेत. ३ विद्यार्थ्यांना डिस्टेक्श मिळाले तर ३० विद्यार्थि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले ३ विद्यार्थि द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
तुषार पटले या विद्यार्थ्यांने ८६. ७० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला बाहे..त्याने आपल्या यशाचे श्रेय आई वडील व शाळेतील शिक्षकांना दिले आहे.
(#thegdv #thegadvishva #Gadchirolinews #sscresult2024)