– अपघातात एकजण गंभीर जखमी
The गडविश्व
अहेरी, दि. ३१ : तालुक्यातील राजाराम ( खां ) येथील दोघांचा दुचाकीने अपघात झाला यात एकजण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना प्राणहिता नदीवरील वांगेपली-गुडेम पुला जवळ घडली. राजू गंगाराम आत्राम (वय ३२) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असून सोबतचा मुलचंद कन्नाके गंभीर हा जखमी झाला आहे.
सदर घटनेची माहिती माजी जि.प.अध्यक्ष अजय कांकडालवार यांना माहिती होताच त्यांनी तात्काळ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची व नातेवाईकांची भेट अपघाताची माहिती जाणून घेतली. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या मुलचंद कनाके यांचा उपचार करण्यास वैद्यकिय अधिकारी यांना कन्नाके परिवारातील सदस्यांना औषध घेण्यासाठी आर्थिक मदत केली तसेच मृतक राजू आत्राम यांचा शविच्छेदन करुन शववाहिका उपलब्ध करून राजाराम येथे नेण्यासाठी आत्राम कुटुंबियांना आर्थिक मदत केली. यावेळी मृतकांचे नातेवाईक तसेच स्थानिक आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews)