The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि.०६ : तालुक्यात ६ जून ला सायंकाळी चार वाजताक्या सुमारास जोरदार आलेल्या वादळामुळे तालुक्यातील निमगाव येथील दोन घरांवर झाड पडून घराचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. त्यामुळे दोन कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे.
सायंकाळच्या सुमारास अचानक जोरदार विजांच्या कडकडाटात वादळ सुरु झाला. या वादळामुळे निमगाव येथिल काशीबाई दाजी कोवे व काजबाई तुळशीराम कोवा यांच्या घरांवर चिंचेचे झाड पडल्याने मोठ्या प्रमाणामध्ये घराचे नुकसान झाले. चार वाजता ची वेळ असल्याने घरामध्ये कोणीही नव्हते. घरातील लोक बाहेर असल्याने जीवित हानी टळली. परंतु वित्त हानी मोठ्या प्रमाणामध्ये झाली. काशीबाई दाजी कोवे यांना मुलगा, सून, चार नातू असा त्यांचा परिवार आहे तर काजबाई तुळशीराम कोवा यांना मुलगी जावई व तीन नातू असा त्यांचा मोठा परिवार आहे. या घरांचा पंचनामा करून शासनातर्फे वेळीच आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त कुटुंबांनी केली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora #nimgao)