– १५ जून पर्यंत पोलीस कोठडी, करोडोंचा केला घोटाळा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : जिल्ह्रातील उपप्रादेशिक कार्यालय, घोट अंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम २०२२-२०२३ या दरम्यान झालेल्या अपहार प्रकरणात यापुर्वी दोन आरोपीतांना अटक करण्यात आली असुन आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी व्यंकटी अंकलु बुर्ले, (वय ४६) कनिष्ठ सहाय्यक आदिवासी विकास महामंडळ व तत्कालीन केंद्र प्रमुख, मार्कंडा (कं), आष्टी रा. आष्टी ता. चामोर्शी, जि. गडचिरोली व गजानन रमेश कोटलावार, (वय ३६ ) निलंबित प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, यवतमाळ व तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली रा. कुंदलवाडी ता. बिलोली जि. नांदेड यांना गडचिरोली पोलीसांनी अटक केली असुन आता राकेश सहदेव मडावी, (वय ३४) प्रतवारीकार तथा विपनन निरीक्षक आदिवासी विकास महामंडळ, घोट याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही १५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गडचिरोली जिल्ह्रातील उपप्रादेशिक कार्यालय, घोट अंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम २०२२-२०२३ या दरम्यान अपहार झाल्याच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे चौकशी करण्यात आली. सदर चौकशित मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम २०२२-२०२३ या दरम्यान एकुण 59947.60 क्विंटल धान खरेदी झाली होती. त्यापैकी प्रत्यक्ष 31532.58 क्विंटल धान जावक झालेला आहे. परंतु मिलर्सना दिलेल्या एकुण वितरण आदेशापैकी 28415.02 क्विंटल धान प्रति क्विंटल 2040/- रुपये प्रमाणे 5,79,66,640/- रुपयांचा मिलर्सना प्राप्त झाला नाही, तसेच गोदामात देखील शिल्लक नाही. त्याचप्रमाणे, महामंडळातर्फे पुरविण्यात आलेल्या एकुण बारदाण्यापैकी 71038 नग, प्रति नग 32.76/- रुपये प्रमाणे 23,27,204/- रुपयांच्या बारदाण्यांचा असा एकुण 6,02,93,845/- रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाल्याने दोन दिवसांपूर्वी तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक व केंद्र प्रमुखास अटक करण्यात आली होती. तर सदर गुन्ह्राचे तपासात ६ जून रोजी राकेश सहदेव मडावी, प्रतवारीकार तथा विपनन निरीक्षक आदिवासी विकास महामंडळ, घोट यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याचा गुन्ह्रातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास ६ जून रोजी अटक करुन ७ जून ला चामोर्शी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १५ जून पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सदर प्रकरण धान खरेदी घोटाळ्याशी संबंधित असल्याने आणखी काही आरोपीतांचा सहभाग असल्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात सपोनि. राहुल आव्हाड, पोउपनि सरीता मरकाम, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.
(#thegdv #thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #gadchirolinews #crimenews #Afghanistan vs New Zealand #Sri Lanka vs Bangladesh
#Ramoji Rao #Best Friend Day #England Football #Alexander Zverev #Canada vs Ireland #Namibia vs Scotland #Gullak)