The गडविश्व
गडचिरोली,दि. १२ : राष्ट्रीय ग्रामिण विकास संस्था आणि पंचायती राज (NIRDPR) या भारत सरकारच्या ग्रामिण विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्थेमार्फत ऑल इंडिया कौन्सिल फॉर एज्युकेशन (AICTE) द्वारे मान्यता प्राप्त असलेल्या आदिवासी विकास व्यवस्थापनासाठी पदव्युत्तर डिप्लोमा (Post Graduate Diploma in Tribal development/ PGDTDM) अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. सदर अभ्यासक्रमाचा कालावधी हा १८ महिन्याचा आहे. सदर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असुन या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज http://www.nirdpr.org.in/pgdtdm.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२४ आहे. सदर अभ्यासक्रमात आवड असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांनी केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )