मतदानाची टक्केवारी वाढविली, आता रक्तदानाची वाढवूया !

1311

– चला रक्तदान करूया
आपल्या दैनंदिन जिवनात मानवजाती विविध प्रकारचे दान करीत असतात. जी वस्तु आपण स्वत: इच्छेने इतरांना देवून परत घेत नाही त्याला आपण दान असे म्हणतो. मग दान करण्याचे प्रकारही विविध आहेत जे आपण दैनदिन जीवन जगत असतांना पाहात येत आहोत. दानाचे महत्व प्रत्येक धर्मातही आपआपल्या परीने सांगितले गेेले आहेत.
आपल्या दैनंदिन जीवनात आपण श्रमदान, भोजनदान, वस्त्र दान, आर्थिक दान ही करतांना पाहिले आहे. तर आता नुकतेच देशभरात मतदान पार पडले हे सुध्दा एक दान आहे. त्याचप्रमाणे ‘रक्तदान’ हे सुध्दा यातील महत्वाचे दान आता मानल्या जात आहे. त्यामुळे रक्तदानाला श्रेष्ठदान असे सुध्दा संबोधले जाते. १४ जून हा ‘जागतिक रक्तदाता दिन‘ (World Blood Donor Day (WBDD) ) म्हणून साजरा करतात. इतर दानाच्या तुलनेत रक्तदान करण्यास मानव हा कमी प्रमाणात पुढे येतांना दिसतो आहे. देशभरात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली यात नवमतदारांची संख्याही वाढली त्यामुळे निवडणुकतील मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली तर मग त्याचप्रमाणे रक्तदानाची टक्केवारी वाढली तर ? मतदान करण्यासाठी नव मतदारप्रमाणे रक्तदानासाठी नव रक्तदाता निर्माण झाला तर ? रक्तदान करण्यासाठी घरातील प्रत्येकांनी पुढाकार घेतला तर ? असे विविध प्रश्न यातुन उद्भवतात.
इतर दानाप्रमाणे रक्तदानासाठी मानव हा पुढे येणे गरजेचे आहे. रक्त हे कोणत्याही कारखाण्यात किंवा कृत्रीमरित्या तयार होत नाही ते केवळ नैसर्गिकदृष्टया सजीवांच्या शरिरामध्ये तयार होत असते त्यामुळे मानव जातीला रक्तदान करण्यासाठी पुढे यावे लागणारच आहे. आपण पाहतो की, दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे, रूग्णालयात विविध आजारांमुळे रूग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे, महिलांच्या प्रसुतीच्यावेळी रक्ताची गरज भासत आहे, विविध शस्त्रक्रिया करतांना विविध रक्तगटाच्या रक्ताची गरज भासतांना दिसत आहे. या सर्वांचा विचार केल्यास रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे कारण रक्तदानासाठी अनेक जण आजही पुढे येत नाही आहे. रक्तदान करण्याचा न्युनगंड अनेकांमध्ये पहावयास मिळत आहे. रक्तदान केल्यास असे होईल तसे होईल, आपल्याला त्रास होईल अश्या विविध प्रकारचा गैरसमज अनेकांमध्ये निर्माण झाला आहे. रक्तदानामुुळे अनेक गरजु रूग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होत असते. सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करण्यास पुढे येणे हे आज गरजेचे झाले आहे असेही वाटते.
प्रत्येकाच्या कुटुंबात ५ व्यक्ती व त्यापेक्षा अधिक व्यक्ती असतात. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला रक्ताची गरज भासु शकते त्यामुळे जर कुटुंबातील दोन लोकांनी रक्तदान करण्याचे ठरविले तर गरजुंना यांची मदत होईल. आज आपण रक्तदान केल्यास पुढे आपल्या रक्ताची गरज भासल्यास रक्तपुरवठा करण्यास मदत होईल. रूग्णालये, रक्तपेढी, विविध संघटना, कोणी वाढदिवस साजरा करतांना रक्तदान शिबीरे आयोजीत करतात. त्या माध्यमातून रक्तदानाविषयी माहिती अनेकांपर्यंत पोहचतांना दिसत आहे तर अनेकांच्या मनात रक्तदानाबद्दल असलेली भितीही दूर होतांना दिसत आहे. रक्ताचा तुटवडा निर्माण होवूच नये यासाठी प्रत्येकाने रक्तदान करणे आवश्यक आहे. कधी आपल्याला गरज पडेल या विचाराने आपणही पुढाकारा घेवूया आणि गरजू व्यक्तीला रक्तदान करूया असा निश्चय करायला हवा. प्रशासनाने निवडणूकीदरम्यान विविध माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आवाहन केले त्याचप्रमाणे रक्तदानाची टक्केवारी वाढवून रक्तपेढीतील तुटवडा कमी करण्यासाठी आवाहन करणेही गरजेचे आहे. गावागावात रक्तदानाविषयी माहिती देवून नागरिकांच्या मनात असलेली रक्तदानाची भिती कशी दुर करता येईल यावर भर देणे आवश्य आहे. नवमतदाराप्रमाणे नव रक्तदाते तयार होणे आवश्यक आहे. त्यामुळेच म्हणावेसे वाटते मतदानाची टक्केवारी वाढविली, आता रक्तदानाची वाढवूया !

रक्तदान करायचे म्हटले की, ती इंजेक्शनची सुई डोळयासमोर यायची. लहानपनापासुनच जरी इंजेक्शनची सुई पाहत आलो असलो तरी सुई घेतांना मात्र थोडीफार भिती  आता मोठ्यापणीही निर्माण होत असायची. त्यातच रक्तदान करतांना काही वेळ सुई ही आपल्या शरीरात राहत असल्याने तितका वेळ सुई आपल्या शरीरात ठेवू शकणार काय याबाबतही भिती निर्माण झाली होती. मात्र एकदा प्रकृती खालावल्याने सलाईन लावण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्या इंजेक्शनच्या सुईची भिती काही प्रमाणात दुर झाली.
माझे मित्र आकाश आंबोरकर (Akasha Amborkar) हे रक्तदानाविषयी अवगत होते. ते ‘स्वयं रक्तदाता समिती’ (Swaym Raktdata Samiti) जी रक्तदान शिबिरे घेवून रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा कमी करण्याचा निरंतर प्रयत्न करीत असतात त्या रक्तदाता समिती सोबत काम करीत असल्याने त्यांनी माझ्या मनातुन रक्तदानाविषयी संपुर्ण भिती दूर करीत योग्य मार्गदर्शन केले. तसेच मी रूग्णाला जेेव्हा रक्ताची गरज भासत असते त्यावेळी त्याच्या कुटुंबातील व्यक्ती हा रक्तासाठी इकडे तिकडे भरकटतांना बघितले, रक्तदाता मिळतो काय यासाठी तो याची त्याची विचारणा करतांना बघितले, वेळेवेर रक्त भेटत नसल्याने त्याला जादा किंमतीमध्ये रक्त घेतांनाही बघितले आहे. ‘स्वयं रक्तदाता समितीचे’ आकाश आंबोरकर तसेच चारूदत्त राऊत (Charudatt Raut ) यांनी माझ्या मानातील रक्तदानाविषयी भिती ९० टक्के दुर केली होती आणि वाढदिवसानिमित्य २०२१ साली प्रथम रक्तदान केले. त्यापुढेही स्वइच्छेने व गरज पडल्यास रुग्णांना रक्तदान करण्यास पुढाकार मी घेतला आहे आणि पुढेही रक्तदान करत राहणार आहे.
रक्तदान प्रक्रिया ही जास्त किचकट किंवा लांब नाही, अनेकांचा समज झाला आहे की रक्तदानासाठी गेल्याबरोबर आपले रक्त काढले जाते मात्र हा न्युनगंड काढून टाकुन एकदा रक्तदानासाठी पुढे येवून रक्तदानाविषयी संपूर्ण माहिती अवगत करून रक्तदान अवश्य करा.

             चला तर मग, मतदानाची टक्केवारी वाढविली, आता रक्तदानाची वाढवूया !

सचिन जिवतोडे, गडचिरोली ( एक रक्तदाता )
रक्त गट A+
– 9767642426
(रक्तदानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्वयं रक्तदाता समिती चे चारुदत्त राऊत, आकाश आंबोरकर अथवा आपल्या नजीकच्या रुग्णालयातील संपर्क साधा )

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #World Blood Donor Day (WBDD) #sachinjiotode #akashamborkar #charudattraut #swayamraktdatasamiti #Oman vs England #Papua New Guinea vs Afghanistan #Tamilisai Soundararajan #JKBOSE 10th Result 2024 #Kuwait #Bridgerton #Florida weather )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here