तंबाखूमुक्त शाळा आणि कॉलेजकरिता प्रयत्न करा

165

-देसाईगंज येथे मुक्तिपथ तालुका समितीची बैठक
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : देसाईगंज येथील तहसील कार्यालयात दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत मुक्तीपथ तालुका समितीची बैठक तालुका समिती अध्यक्ष तथा तहसीलदार प्रीती डूडूलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तालुक्यातील शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. यासोबतच अवैध दारूविक्री बंदीसाठी पोलिस विभागाला पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीमध्ये या शैक्षणिक सत्रामध्ये तंबाखूमुक्त शाळा आणि कॉलेज यावर भर देण्याचे ठरले तसेच शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त करण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला. शहरी भागातील किराणा आणि पानठेला व्यावसायिकांची संयुक्त बैठक नगरपरिषदच्या साहाय्याने लावून त्यांना कॅन्सरचे दुष्परिणाम आणि त्यापासून अनेक गंभीर आजाराचे महत्त्व पटवून देण्याचे ठरले. यावेळी तालुक्यातील दारू विक्री सुरू असलेली 8 गावे आणि 7 वॉर्ड बंदीकरिता पोलीस विभागाला पत्र आदेश तालुका समिती देण्याचे ठरले. विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये परिपाठच्या वेळी 5 मिनिट व्यसनावर मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. जेणे करून येणारी पिढी व्यसनाधीन होणार नाही. शाळा-कॉलेजमध्ये सरप्राईज विझिट करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच शासकीय कार्यालये आणि तालुक्यातील सर्व शाळा- कॉलेजच्या 100 यार्ड परिसरातील पानठेले हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार , तालुका आरोग्य अधिकारी ठीकरे, नगर परिषद, पंचायत समिती, ITI कॉलेजचे NSS प्रमुख, शिक्षण विभाग, तालुका संघटनेच्या अध्यक्षा शेवंता अवसरे, साची कापसे, माजी नगर सेवक सचिन खरकाटे सह मुक्तीपथ तालुका संघटक तथा तालुका समिती सचिव भारती उपाध्याय, स्पार्क कार्यकर्ती अर्चना मेक्कलवार, इंटर्न राजेश राजोले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here