-दारूबंदी गाव संघटनेचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना करूनही अवैध व्यवसाय बंद न केल्याने अखेर पोलिस विभागाकडे दारूविक्रेत्यांची यादी सादर करून विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी वैधकीय अधिकारी व दारूबंदी गाव संघटनेने केली आहे.
जिमलगट्टा गावात सुरु असलेली अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या वतीने पोलिस विभागाला लेखी तक्रार देण्यात आली. या गावात अवैध दारूविक्रीमुळे गावातील तरुण पिढी वाईट व्यसनाच्या आहारी जात आहे. गावाची शांतता व आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनेच्या वतीने कृती केली जात आहे. दारूबंदी व्हावी यासाठी सदर विक्रेत्यांना वारंवार सूचना दिली. तरीसुद्धा दारूविक्रेत्यानी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळे गावातील विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करून गावाला दारूविक्रीच्या समस्येतून मुक्त करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )