गडचिरोली : उपसरपंच पाठवायचा विवाहित महिलेस अश्लिल मॅसेज, कोर्टाने ठोठावली शिक्षा

1259

– अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहेरी आर.एन. बावणकर यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : एका विवाहित महिलेस ग्रामपंचायतीचा उपसरपंच धर्मय्या किष्टया वडलाकोंडा हा अश्लिल मॅसेज पाठवीत असल्याने त्रस्त विवाहित महिलेने पोलिसात तक्रार दिली. उपसरपंचावर पोस्टे असरअल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र सेशन कोर्टात दाखल केले असता अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन. बावणकर यांनी कलम ३५४(ड) भादवी मध्ये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा तसेच पुढील तीन वर्षाकरीता याप्रकारचे गुन्हे करणार नाही याचे हमीपत्र व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
उपसरपंच धर्मय्या किष्टया वडलाकोंडा (वय ४३) रा. असरअल्ली ता. सिरोंचा जि, गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. हा पिडीत महिलेसह फोनवर अश्लिल बोलून व मॅसेज करायचा. याबाबत तिने आपल्या पतीस माहिती दिली. पतीने उपसरपंच याला त्याबाबत विचारले असता उपरपंचाने त्यांना शिवीगाळ केली तसेच आरोपींची पत्नी हिनेही पीडितेच्या घरी जाऊन धमकावले. दरम्यान पिडीतेने पोस्टे असरअल्ली गाठून तोंडी रिपोर्ट दाखल केली असता कलम ३५४(४), ५०४,५०९ भादवी तसेच ३(२) अट्रोसिटी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने दोषारोपपत्र तयार करुन सेशन कोर्टात दाखल केले.
अतिरिक्त सत्र न्यायालय, अहेरी याने स्पेशल केस मध्ये साक्ष पुरावा घेतले असता फिर्यादी व साक्षीदार यांचे पुरावा व सरकारी पक्षाचे युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन २१ जून २०२४ रोजी आरोपी धर्मस्या किष्टया वडलाकोंडा यास कलम ३५४(ड) भादवी मध्ये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा तसेच पुढील तीन वर्षाकरीता याप्रकारचे गुन्हे करणार नाही याचे हमीपत्र व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी वकील सचिन यू. कुंभारे यांनी कामकाज पाहीले तसेच गुन्हयाचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार तसेच मजानन राठोड यांनी केला, तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्मती करीता कोर्ट पैरवी अंमलदार यांनी कामकाज पाहीले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #sironchq #crimenews #ahericort)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here