गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधीसह इतर मागण्यांकरीता अधिवेशनात लक्ष वेधणार : आमदार डॉ. देवराव होळी

103

 – पत्रकार परिषदेतून दिली माहिती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या कामांसाठी निधी मागण्या सोबतच विधानसभा क्षेत्रात असणाऱ्या समस्यांच्या संदर्भात शासनाला प्रश्न करून सरकारचे लक्ष गडचिरोली विधानसभा क्षेत्राकडे वेधणार आहोत. तसेच या अधिवेशनामध्ये सामाजिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे तारांकित ३५ प्रश्न, लक्षवेधी १७ प्रश्न, औचित्याचे मुद्दे ११ व २ अर्धा तास प्रश्नाच्या माध्यमातून व वेळेवर येणाऱ्या चर्चामध्ये आपण सहभागी होऊन जिल्ह्यातील समस्या अधिवेशनात मांडणार आहोत अशी माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी आज पत्रकार परिषदेतून माहिती दिली.
उद्या २७ जून पासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन मुंबई येथे होत आहे. अधिवेशनात गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील उपसा सिंचन योजनांना निधी उपलब्ध करून देणे, वादळ वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना आर्थिक मदत देणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय सह महत्वाच्या प्रशासकीय भवनांसाठी निधी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासोबतच प्रवेश प्रक्रिया सुरू करणे, मार्कडा देवस्थान मंदिराचे काम सुरू करणे, नरभक्षक वाघांचा व हिंसक झालेल्या हत्तींचा बंदोबस्त करणे, वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या परिवाराला शासकीय सेवेत घेणे, वैद्यकीय महाविद्यालयासह महत्वाच्या प्रशासकीय इमारतींसाठी निधी, बंगाली बांधव, झाडे झाडीया समाज बांधव, तसेच ओबीसी बांधवांच्या सामाजिक हिताचे प्रश्न, आरोग्य सेवा, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन, रेती रॉयल्टी चा प्रश्न, रस्ते पूल इत्यादी बांधकामासाठी आवश्यक असणारा निधी, शैक्षणिक कार्याकरीता निधी इत्यादी सामाजिक हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न मांडून त्यातून सरकारचे लक्ष वेधणार आहे असेही आमदार डॉ. होळी यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला लोकसभा समनव्यक प्रमोद पिपरे, माजी पंचायत समिती सभापती विलास देशमुख, युवा मोर्चा प्रमुख अनिल तिडके, तालुका अध्यक्ष विलास भांडेकर, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, जयराम चलाख, साईनाथ बुरांडे यांचेसह युवा मोर्चा चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे हजर होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #mlaholi #vidhansabha )

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here