– तिन किलो वजनाचे दोन टिफीन बॉम्ब, जिलेटीन, वायर, डेटोनेटर, वर्दी, नक्षली साहित्य केले जप्त
The गडविश्व
दंतेवाडा : विस्फोटक साहित्यांसह चार नक्षलींना ताब्यात घेतल्याची कारवाई दंतेवाडा येथील सीआरपीएफ 231 बटालियन व डीआरजी पथकाने संयुक्त रित्या केली. यावेळी नक्षल्यांसह तिन किलो वजनाचे दोन टिफीन बॉम्ब, जिलेटीन, वायर, डेटोनेटर, तीन बॉम्ब, वर्दी, व नक्षल्यांचे इतर दैनंदिन साहित्य जप्त करण्यात जवानांना यश आले आहे. सदर कारवाईमुळे मोठी घटना होण्याचे टळले आहे.
प्राप्त माहितीनुसार, नक्षल्यांच्या कारवईची माहिती मिळताच दंतेवाडा जिल्हयातील सिआरपीएफ जवानांनी कमरगुडा, दुर्माजवळील जंगलात शोधमोहिम राबविली यावेळी जंगलात नक्षली लपून बसल्याचे कळले तेव्हा जवानांनी नक्षल्याना घेराव घालून अटक केली. अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांमध्ये डीएकेएमएस सदस्य माडवी देवा, मिलीशिया सदस्य मुचकी नंदा, सुक्का मुचकी, सोढी लखमा यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांचा रस्ते बांधाकामावरील वाहनांची जाळपोळ, कंत्राटदारांना मारहाण करणे, सैनिकांना इता करण्यासाठी गस्ती मार्गावर आयइडी लावणे यासह अन्य गुन्हयांमध्ये समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांकडून प्रत्येकी तिन किला वजनाचे दोन टिफीन बॉम्ब, पाख् जिलेटीन काठया, एक वायरलेस सेटही जप्त करण्यात आला. सदर नक्षल्यांची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता नक्षल्यांनी ही स्फोटके प्रेशर बॉम्बसाठी वापरली जाणार असल्याचे सांगितले. सदर कारवाईमुळे मोठी घटना होण्याचे टळले आहे.