मोफत टॅब योजनेचा ओबीसी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

166

– राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्या वतीने महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE, NEET, MHT-CET बॅच २०२६ च्या परिक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थीना मोफत टॅब व ६ जीबी डाटा प्रती दिन दोन वर्षांकरिता पुरवण्यात येत आहे.
तरी इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी १० जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने गडचिरोली जिल्हा अध्यक्ष राहुल भांडेकर, आरमोरी तालुका अध्यक्ष चेतन भोयर, तालुका सचिव हरिष नैताम, जिल्हासहसचिव मिथुन शेबे, जिल्हाकार्याध्यक्ष मनोज पिपरे, युवती जिल्हाध्यक्ष संतोषी सुत्रपवार यांनी केले आहे.

अर्जासाठी पात्रता :

सन २०२४ मध्ये १०वीची परिक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
१०वीच्या परिक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी ६० टक्के तर शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के असणे आवश्यक आहे.
सदर विद्यार्थी ११वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.

( #gadchirolinews #gadchirolilocalnews #thegadvishva #thegdv )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here