The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ३० : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंधळी (सोन) येथे शाळा व्यवस्थापन समितीचे प्रशिक्षण कार्यक्रम २२ जून रोजी आयोजित करण्यात आला होता. एनपीसीआय व एल एल एफ अंतर्गत आयोजित या प्रशिक्षणात समिती सदस्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना त्यांच्या कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाची ओळख करणे हे होते. समिती सदस्यांना शाळेच्या सर्वांगीण विकासात आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मन्साराम काटेंगे, उपाध्यक्ष भामिनाताई अंबादे, सदस्य शशीकलाताई हारामी, कु. श्रेयाकाटेंगे, सौ.मंजुळाबाई सांगोळे, कु. कुंदन भैसारे, सौ.जयमालाताई भैसारे, सौ. वैशाली केरामी, सौ. सुनीताताई काटेंगे, सुनंदा हारामी, सौ. खुरेशा मडावी, प्रवीण चौधरी, अनिल सोरते हे उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे आयोजन मुख्याध्यापक नरेश बनसोड यांनी केले होते.
कार्यक्रमात उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी हा प्रशिक्षण उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या अधिक परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ते ज्ञान आणि कौशल्य मिळवले असल्याची भावना व्यक्त केली.
या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक नरेश बनसोड आणि एल एल एफ ट्रेनर प्रतीक्षा किरमिरे, यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले. या कार्यक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय व्यवस्थापनात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda )