धक्कादायक : एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून

2685

– अतिउत्साह नडला
The गडविश्व
पुणे, दि. ०१ : लोण्यावळ्यातील भूशी डॅम परिसरात फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना ३० जून रोजी घडली. या घटनेचा मन सून्न करणारा व्हिडीओही समोर आला आहे. दरम्यान घटनेनंतर वाहून गेलेल्या महिला आणि दोन मुलींचे मृतदेह सापडले होते तर त्यानंतर काही वेळाने दोन जणांचे मृतदेह सापडले.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी कुटुंब लोणावळ्यात फिरण्यासाठी गेले होते. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील रेल्वेचा वॉटर फॉल ओळखल्या जाणाऱ्या धबधब्याजवळ अन्सारी कुटुंब गेले होते. दरम्यान येथूनच अन्सारी कुटुंबातील पाचजण वाहून गेले. मृत्यू झालेल्यांमध्ये ३६ वर्षीय महिला, १३ वर्ष, ८ वर्ष, ४ वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. अन्सारी कुटुंब हे पुण्यातील स्थानिक रहिवासी असल्याची माहिती आहे.
भुशी डॅमला फिरायला गेले होते मात्र क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आणि कुटुंबातील ५ जण भुशी डॅममध्ये वाहून गेले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #lonawaladamp #pune )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here