– परिसरात खळबळ
The गडविश्व
ता. प्र / मूल, दि. ०६ : घराशेजारील केबल बाजूला कर असे म्हटल्याने रागाच्या भरात बाप लेकाने घराशेजारच्याची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना मूल तालुक्यातील हळदी येथे आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. राजू शेषराव बोदलकर (वय ३०) रा. हळदी असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारी असलेल्या झाडाचे फांद्या तोडल्यानंतर लागूनच असलेला केबल बाजूला कर असे राजू बोदलकर यांनी प्रमाणे सांगितले मात्र सूरज गुरुदास पिपरे (वय २१) आणि गुरुदास नक्तू पिपरे या बाप -लेकाने बोदलकर यांच्याशी वाद घातला. किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत होत बापलेकांनी बोलाकर यांच्यावर हल्ला करत कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमलेली होती. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत आरोपी बापलेकास अटक करण्यात आली आहे. आरोपीस काठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही गावातील नागरिकांकडून होत आहे.
घटनेने मृतकाच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी आहे.
(#thegdv #thegadvishva #chandrpuenews #murder #mulnews #crimenews )