राज्यात घोटाळ्यांची मालिका सुरूच : आता पोलीस भरतीत मोठा घोटाळा झाल्याचे उघड

384

– परीक्षेला डमी उमेदवार बसवण्यात आल्याचे उघडकीस
The गडविश्व
मुंबई : राज्यात घोटाळ्याची मालिका सुरूच असल्यचे दिसत आहे. टीईटी घोटाळा , आरोग्य भरती घोटाळा, म्हाडा परीक्षा घोटाळा यानंतर आता पोलीस भरती मध्येही मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.
पोलीस भरतीत डमी उमेदवार परीक्षेला बसविण्यात आल्याचे उघडकीस आले असून परीक्षेला मिळता चेहरा असणाऱ्याला बसविण्यात आले. परीक्षा पास होण्यासाठी उमेदवारांनी चक्क ३ लाख रूपये मोजले असल्याचेही कळते. सदर प्रकरणाचा छडा ‘झी 24 तास’ने लावला आहे.
मुंर्बइं पोलीस दलात 14 नोव्हेंबर रोजी 1076 शिपाई पदासाइी भरती घेण्यात आली होती. यासाठी 6 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान उत्तीर्ण उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली होती. मात्र पोलीसांनी या मैदानी चाचणीचे व्हिडीओ रेकॉर्डींग तपासले असता धक्कादाय वास्तव समोर आले. शारीरीक क्षमता नसलेल्या उमेदवारांच्या जागी दुसऱ्याच उमेदवारांना उभे केल्याचे निदर्शनास आले. या पोलीस भरती घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे तर 8 जण फरार आहे.
मुळ उमेदवार आणि डमी उमेदवार यांच्यातला फरक दिसु नये यासाठी मिळते जूळते चेहऱ्याचे तरूण शोधले जायचे. दोघांची शरीरयष्टी सारखीच असेल याची काळजी घेतली जायची. मात्र पोलीसांनी मैदानी चाचणीचे व्हिडीओ तपासले असता सर्व गौडबंगाल समोर आले आणि बोगस पोलीस भरतीचा पर्दाफाश झाला. बहुतांश आरोपी हे बीड आणि औरंगाबादचे असल्यचे उघड झाले. या घोटाळेबाजांना खाकीचा सहवास तर मिळेल मात्र तरूगांत हे निश्चीत झाले.
डमी उमेदवारांमागे ‘औरंगाबाद’ कनेक्शन असून, मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. उत्तम धावपटूचा बनावट उमेदवार म्हणून सहभाग असल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यात आणखी 42 जण संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here