The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : गावातील वाढते व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी आशा म्हणून कोणती उपाययोजना करावी यासाठी मुक्तिपथ चमू देसाईगंज द्वारा आरोग्य विभाग समन्वयातून नुकतेच मार्गदर्शपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी देसाईगंजचे तालुका आरोग्य अधिकारी ठिकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून सावंगी उपकेंद्राचे डॉ. अशोक गहाणे, मुक्तिपथ तालुका संघटिका भारती उपाध्याय, तालुका समन्वयक आठवले आणि स्पार्क कार्यकर्ती अर्चना मेकलवार प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीला तालुक्यातील 75 आशा उपस्थित होत्या.
समाजात वाढलेल्या व्यसनाचे प्रमाण बघता प्रत्येक गावात आणि वार्डामध्ये जनजागृती व्हावी, यासाठी मुक्तीपथ तर्फे आरोग्य शिक्षण कार्यक्रम घेतले जातात. गाव पातळीवर आरोग्य विषयासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशाताई आहेत. गावात दारूचे व्यसन करणारे कोण आहेत, याबाबत आशाताईंना माहिती असते, दारूचे व्यसन सोडावे म्हणून एक दिवसाचे शिबीर गावात मुक्तिपथच्या माध्यमातून आयोजित करावे. तसेच गर्भवती व स्तनदा माता जर खर्रा किंवा कोणताही तंबाखूजन्य पदार्थ वापरत असेल तर बाळाला तंबाखूजन्य पदार्थामधील विष हि माता देत असते. यासाठी गावात अशा महिलांसाठी आरोग्य शिक्षण शिबीर मुक्तिपथच्या माध्यामातून आयोजित केले पाहिजे. जेणेकरून महिला मधील तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होईल. तसेच गावात किंवा शहरात सर्वत्रच प्रौढ स्त्री-पुरुष मध्ये तंबाखू, खर्रा सेवनाचे प्रमाण मोठे आहे, मोठे व्यक्ती खातात पण किमान आपल्या मुलाला/मुलीला तरी तंबाखु पदार्थ खाऊ देऊ नका. आपल्या मुलांना कॅन्सर पासून वाचवा हा संदेश देण्यासाठी पालक बैठक आयोजित करून आरोग्य शिक्षण केल्या जाऊ शकते. इत्यादी कार्यक्रमाची माहिती आशांना देवून त्याच्या माध्यमातून गावात आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जावे याची माहिती देण्यात आली. गावात जाणीवजागृती वाढावी व तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी काय काय करता येईल इत्यादी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली व कृती कार्यक्रम देण्यात आला.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #muktipath )