The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १२ : तालुक्यातील रांगी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या रांगी गावात एक आणि मागिल आठवड्यात निमगाव येथे एक असे दोन डेंगूचे रुग्ण आढळल्याने येथील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सुरक्षेचा उपाय म्हणून रांगी गावांमध्ये टिम बनवून घरोघरी भेट देताना दिसतात आणि वेळीच खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मशीनच्या माध्यमातून लिक्विड ची फवारणी करण्यात येत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील रांगी येथे एक डेंगू चा रुग्ण आढळला त्याला धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर मागील आठवड्यामध्ये निमगाव येथे सुद्धा डेंगू चा रुग्ण आढळला या दोन्ही रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
डेंग्यू रोग मानसाला अतिशय धोकादायक असल्याने सतर्कतेचा उपाय म्हणून रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रातिल कर्मचारी गावामध्ये फिरून गावातील लोकांना जनजागृती करून नाल्या आणि घरात साफसफाई करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. वेळीच उपाय न झाल्यास डेंगूच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि रुग्ण सुद्धा दगावण्याची शकता नाकारता येत नाही. त्यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागले असून डेंगू रोग पुन्हा पसरू नये याची खबरदारी घेण्याचे आवाहन सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora #dengu)