The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : मुक्तिपथ तर्फे शाळा महाविद्यालयांमध्ये विवध कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात येते. विद्यार्थ्यांना विविध व्यसनाची माहिती देत त्यातून सुटका कशा पद्धतीने करता येईल याबाबत अवगत करण्यात येते.
देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील जि.प शाळेमध्ये मुक्तिपथ तर्फे तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रम घेण्यात आला. यातून विविध खेळाच्या माध्यमातून तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत माहिती दिली. सोबतच तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे तसेच आपली शाळा तंबाखूमुक्त करण्याचे आवाहन केले.
( #thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )