आजाद समाज पार्टी गडचिरोलीची कार्यकारिणी घोषित : शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

331

– ऑक्टोबर मध्ये खा.चंद्रशेखर आझाद यांची गडचिरोली मध्ये महासभा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : नुकताच झालेल्या लोकसभेत बहुजन आंदोलनातील सर्व नेते आणि पक्षांची पीछेहाट पाहता देशभरात बहुजन आंदोलनाचे नेतृत्व लयास जातानाचे चित्र उभे राहताना अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या न्याय हक्काच्या आंदोलनातून पुढे आलेला तरुण नेता भिम आर्मी चीफ व आजाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आजाद रावण यांनी स्वतंत्रपने खासदार म्हणून निवडून आल्याने देशभरात एक आशा निर्माण झाली व बहुजन चळवळीला गती प्राप्त होताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या टोकावर असणाऱ्या गडचिरोली मध्ये प्रदेशाद्यक्ष आनंद लोंढे, प्रदेश प्रभारी अविनाश शांती आणि प्रदेश प्रवक्ते ॲड. सुमित साबळे यांच्या नेतृत्वात आज मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला व कार्यकारिणी सुद्धा जाहीर करण्यात आली. यावेळी विशेष अतिथी म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या जयश्रीताई जराते उपस्थित होत्या.
पक्षाच्या जिल्हाप्रभारी पदी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष पदी राज बन्सोड, जिल्हा कार्याध्यक्ष पदी विनोद मडावी, यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा महासचिव पदी पुरुषोत्तम रामटेके, जिल्हा प्रवक्ते पदी प्रितेश अंबादे, जिल्हा सचिव पदी प्रकाश बन्सोड, कुरखेडा तालुकाध्यक्ष पदी सावन चिकराम, धानोरा तालुकाध्यक्ष पदी प्रशांत पेंदापल्लीवार, गडचिरोली शहराध्यक्ष पदी नागसेन खोब्रागडे तसेच महिला कार्यकारिणी मध्ये जिल्हाध्यक्ष पदी तारका जांभुळकर, जिल्हा सचिव पदी शोभा खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष पदी सविता बांबोळे, शहराध्यक्ष पदी प्रतिमा करमे, वडसा तालुकाध्यक्ष पदी सपना मोटघरे इत्यादी पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून लवकरच पक्ष विस्तार होणार असल्याचे सांगितले.
आगामी निवडणुकीत देशभरात आजाद समाज पक्ष निवडणुकीत ताकदीने उतरणार असून महाराष्ट्रात किमान १० सभा खासदार चंद्रशेखर आजाद यांच्या होणार आहेत. त्यापैकी गडचिरोली मध्ये एक सभा होणार आहे.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असून विकासाच्या दृष्टीने कायम वंचित राहिलेला तर आहेचं परंतु येथील आदिवासी संस्कृती व न्याय हक्कावर गदा आणण्याचे काम आजवर होत राहिले आहे. त्याचेच परिणाम म्हणजे इथे पेसा कायद्याची अद्याप पूर्ण अमलबजावणी झाली नाही, सुरजागड सारख्या खाणी जिल्ह्यात आणून आदिवासीच्या जल -जंगल -जमीन हिसकावून घेऊन आदिवासी जिवन उध्वस्त करणे, ज्या ठिकाणी अद्याप शिक्षण पोहचला नाही अशा ठिकाणच्या हजारो सरकारी शाळा बंद करणे, अतिशय दुर्गम भागात आदिवासी आश्रम शाळा व सरकारी दवाखान्यात जिकरीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोजनंदारीने मजुरासारखे वागविणे, जिल्ह्यात कोणत्याही भरती मध्ये स्थानिकांना प्राधान्य न देणे ह्या सर्व अन्यायकारक बाबी असून शिक्षण, आरोग्य व रोजगार यासोबत आदिवासीचे अधिकाराचे हनन या मूलभूत मुद्याना घेऊन आजाद समाज पार्टी जिल्ह्यात पुढील निवडणुकामध्ये उतरणार आहे. असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी केले.
दलित, आदिवासी व मुस्लिमांसह ओबीसी मधील वंचित समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर नव्हे तर संसदेत खासदार चंद्रशेखर आझाद रावण यांचा आवाज बुलंद करण्यासाठी जनतेने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रभारी अविनाश शांती यांनी केले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित होते व संचालन प्रितेश अंबादे तर आभार प्रतीक डांगे यांनी केले. यशस्वीतेसाठी पवन माटे, पुरुषोत्तम बांबोळे, सचिन गेडाम, प्रणय दरडे, प्रेम धनविजय, जितेंद्र बांबोळे, घनश्याम खोब्रागडे, सोनाशी लभाने, तामस शेडमाके, सतीश दुर्गमवार, आशिष गेडाम, शुभम पाटील, अमोल मोटघरे, सुनिल बांबोळे, मधुकर लोणारे, सुरेश बारसागडे, जयश्री बांबोळे, नेहा रामटेके आदिनी प्रयत्न केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here